पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील २००५ पासून खचणाऱ्या १०५ मीटर लांबीच्या ‘डेंजर झोन’ रस्त्यावरील काम १५ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अमेरिका-इराण युद्धामुळे कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’चे काम रखडल्याचा दावा जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी केला आहे.

आगामी पावसापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास स्थानिकांकडून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनीही कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणासाठी पुकारलेल्या आंदोलनाप्रमाणे कशेडी घाटाच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन कोकणातील पत्रकारांना केले.