मंडणगड : क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील शांतीदूत क्रिकेट संघाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवत जि. प. केंद्रशाळा देव्हारे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी शांतीदूत क्रिकेट संघाचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
शांतीदूत क्रिकेट संघाचे अध्यक्ष सागर तांबे व कार्याध्यक्ष राकेश लोखंडे यांनी भविष्यातही क्रीडा क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेचे उपसरपंच तुषार करावडे, वेसवी हायस्कूलचे प्राध्यापक राजेश जाधव,माजी तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड. सुमेश घागरुम, उपाध्यक्ष दिनेश बोबले,केंद्रप्रमुख रजनी जाधव,मुख्याध्यापक भिकू बोर्ले, उपशिक्षिका स्मिता पाटील, विद्या पवार, तसेच शांतीदूत क्रिकेट संघाचे अध्यक्ष सागर तांबे, कार्याध्यक्ष राकेश लोखंडे, उपाध्यक्ष निलेश येलवे, उपाध्यक्ष विशाल तांबे, चिटणीस प्रतीक तांबे, उपचिटणीस संकेत रूके, खजिनदार आदेश जाधव, उपखजिनदार आदित्य येलवे, सल्लागार रोहित तांबे, वसंत तांबे, सुरेश तांबे यांच्यासह पालक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सल्लागार रोहित तांबे यांनी केले.
शांतीदूत क्रिकेट संघाच्या वतीने जि.प.केंद्रशाळा देव्हारे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…
