लांजा : श्रावण महिना व गणपती आले की जाखडी नृत्याचा कार्यक्रम रंगू लागतो.यामध्ये शक्तीवाले व तुरेवाले यांच्यात डबल बारीचा कार्यक्रम आवडीने गणपतीतून लोक ठेवतात.
कोंड्ये कातलवाडी येथील सुप्रसिध्द शाहीर भानू तुकाराम झिमण यांनी वयाच्या विस वर्षा पासुन जोपासत आहेत जाखडीची नृत्य कला व नमन जाखडीचा कालावधी जूलै ते ऑक्टोबर व नमानाचा कालावधी नोव्हेंबर ते जून या महिन्यात भानू झिमण यांचे कार्यक्रम होत असतात.
गण,गौळण,वग,पद,प्रश्न, उत्तर यात भानू झिमण यांची भुमिका उत्तम चांगल्या प्रकारे असतें कोंड्ये गावचे झिमण यांचा कार्यक्रम म्हटले की तो पाहाण्यासाठी आवर्जून अलोट प्रेसकांची गर्दी असातेच.