नवी दिल्ली : सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, शेतीमालाचे चुकीचे धोरण आणि परराष्ट्र धोरणातील अस्थिरता,जो शोषित, वंचित आणि दुर्बल घटक आहे, त्याच्या कल्याणासाठी असलेला पैसा काढून घेणे अत्यंत असंवेदनशील आहे. निवडणुका आल्या की अशा योजना जाहीर करायच्या आणि निवडणुका संपल्या की बजेटअभावी वगळायचे, हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळण्याची वेळ आली की केंद्र सरकार निर्यातबंदी किंवा नियमांत बदल करते. कृषी मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयात अजिबात समन्वय नाही. लहरी धोरणांमुळे जागतिक बाजारपेठेत भारताची विश्वासार्हता कमी होते आणि देशातील सामान्य शेतकरी मात्र भरडला जातो. गेल्या 15 दिवसांत सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,कुंभमेळा आणि मोठ्या महामार्गांवर हजारो कोटींची उधळपट्टी केली जात आहे, तर दुसरीकडे मराठी शाळा, आश्रमशाळा आणि रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. पुण्या-नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे ही वस्तुस्थिती आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती असताना सरकारने मोठे ‘बिग तिकीट’ प्रकल्प करण्यापेक्षा शाळा, आरोग्य केंद्रे, स्थानिक रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांवर खर्च करावा, असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,शेजारील देशांसोबतचे बिघडलेले संबंध, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेवर चिंता व्यक्त करत, आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमचा कोअर ग्रुप नियमितपणे पक्षीय आढावा बैठका घेत असतो. 29 तारखेला होणारी बैठक ही नियमित संघटनात्मक बैठक असून विलीनीकरणाचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.