चिपळूण : जिल्हा परिषद यांच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि श्री देव गोपाळ कृष्ण (हवेली) मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने हवेली, खेंड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी संस्थेचे श्री. लीलाधर भानुशाली, श्री. अजित भानुशाली, श्री. दीपक भाटिया, माजी नगरसेवक श्री. प्रकाश काणे, श्री. आशिष खातू, श्री. उदय गांधी आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य मंदिराच्या डॉक्टर मानसी म्हापदी, सुजाता बजयंत्री आदींनी उत्तम सहकार्य केले.
याप्रसंगी परिसरातील ७१ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री पराग ओक, श्री. उदय सलागरे, सौ. लीना भाटिया, सौ. हर्षदा जोशी, सौ. संगीता काटकर, श्री. विकास भाटिया आणि श्री. साईनाथ कपडेकर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
