आबलोली : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक श्री. निलेश भगतवान सांबरे हे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता पालशेत येथील श्रीम. रखुमाई पालशेतकर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोफत वह्या वाटप आणि विद्यार्थी-पालक, ग्रामस्थ व मान्यवरांशी संवाद होईल. सकाळी ११.४५ वाजता पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या सीनियर कॉलेज येथे मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता गुहागर खालचा पाट-जांभळेवाडी येथे ऍड.प्रसाद प्रजा प्रभाकर जांगळे यांच्या कायदेविषयक नूतन कार्यालयास भेट देऊन उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दुपारी २ वाजता आबलोली येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन होणार आहे.
या दौऱ्यात शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांना मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देण्यावर भर दिला जाणार असल्याने गुहागर तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगतवान सांबरे यांचा ११ सप्टेंबरला गुहागर तालुका दौरा…
