लोटे : – खेड तालुक्यातील घाणेखुंट लोटे येथील परशुराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे विनती ऑरगॅनिक्स लि. च्या सी एस आर फंडातून मिळालेल्या देणगीतून सर्व अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधांसह स्त्री रोग शस्त्रक्रिया आगार व प्रसूतिगृहाचे उद्घाटन अतिशय उत्साहात पार पडले.
यावेळी विनती ऑर्गनिक लिमिटेडचे अध्यक्ष महादेव महेमान, जनसंपर्क अधिकारी सचिन खरे, घाणेखुंटेचे सरपंच संतोष ठसाळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव अतुल कुलकर्णी, सल्लागार समितीचे सदस्य डॉ.संतोष देशपांडे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शशांक रेडीज, परशुराम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन उत्पात, उपअधीक्षक डॉ. अनुपम आलमान तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते स्त्रीरोग शस्त्रक्रिया आगार व प्रसूतीगृह विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विनती ऑर्गनिक लिमिटेडने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल कंपनीचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच या नव्या विभागामुळे परिसरातील महिलांना आणि गर्भवती मातांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.