चिपळूण : कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असलेल्या ‘नारी सन्मान प्रतिष्ठान’च्या वतीने चिपळूण अर्बन बँकेचा सन्मान करण्यात आला. बँकेला सलग दुसऱ्यांदा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी नारी सन्मान प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. प्रियांका कारेकर, सौ. सीमाताई सदानंद चव्हाण-वहिनी, सचिव सौ. तेजल पेढाबकर, श्री. व्ही. सी. पेढाबकर तसेच प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

बँकेने सलग दुसऱ्यांदा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार मिळवत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थितांनी बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.