मुंबई : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश कमिटीची आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरेसाहेब, विधानसभा उपाध्यक्ष मा. श्री. अण्णा बनसोडे साहेब, प्रदेश खजिनदार आ. शिवाजीराव गर्जे, आ. संजय बनसोडे, माजी आमदार लहू कानडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सुनीलभाऊ सावर्डेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी जिल्हा सामाजिक न्याय कमिटीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी रमेश कादवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.

बैठकीस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासह आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.