मंडणगड : केंद्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालुक्यातील मुळगाव आंबवडे या गावचा पंचतीर्थामध्ये समावेश केलेला असल्याने या गावासह मंडणगड तालुक्यातील पर्यटनाचे महत्व असलेल्या विविध गावांचे व ऐतिहासिक महत्व असलेल्या देवालयांचे विकास कामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव कार्यकर्त्यांनी सादर करण्याच्या सूचना माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिल्या. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुरत्न २.० या योजनेची माहिती देण्यासाठी मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे पार्टीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद, पत्रकारांशी संवाद साधून तालुक्यातील कार्यकर्त्यांना या योजनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील पर्यटन, कृषी, महिला बचत गट, व सेवा उद्योग यांचे निर्मिती करीता रत्नसिंधु योजनेचा लाभ कसे मिळवता येतील याची माहिती दिली. याचबरोबर या योजनेशी संलग्न शासनाच्या विविध योजना, ग्रामीण पर्यटन, बॅक वॉटर, कांदळवन संरक्षण, कॅराव्हॅन सुविधा यांची विस्ताराने माहिती दिली. या सभेस जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे संयोजक अजय दळवी, भाजप तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडीक, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सचिन थोरे, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष रविकुमार मिश्रा, खेड अध्यक्ष विनोद चाळके, उत्तर रत्नागिरी जिल्हा मागासवर्गीय मोर्चाचे सरचिटणीस अभिजीत देवळेकर, जिल्हा सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, तालुका सरचिटणीस ॲड. सुशील दळवी, यश मेहता, उपाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, विजय दुर्गवले, महिला मोर्चा अध्यक्षा श्रेया दळवी, श्वेता महाडिक, शहर अध्यक्ष आनंद नारकर, आकाश नाविलकर, रामदास भागडे, तेजस सुतार, डॉ. प्रभाकर पेंडसे, श्रीकृष्ण साठे यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
