खेड :- तालुक्यातील शेल्डी गावच्या मुळ रहिवाशी असलेल्या पण पुणे भोसरी येथे व्यवसाय/ नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या आणि गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी शेल्डी ता. खेड, जि. रत्नागिरी या गावी पुणे खेड एस.टी. बसने खेड बस स्थानकावर आदिती विनोद आंब्रे या पहाटेच्या वेळी शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी 05.00 वाजताच्या सुमारास उतरल्या आणि येथील बस स्थानकावर 60,000/- रुपये किंमतीचा लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याने, या घटनेची माहीती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांचे समवेत पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू , पोलीस कॉन्स्टेबल सोहेल ढगे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा दराडे, पोलीस कॉन्स्टेबल विजेन सातार्डेकर यांच्या पथकाने तात्काळ तपास करून सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे गहाळ झालेल्या लॅपटॉप बॅगचा तपास बारा तासाच्या आत करुन, त्याचा तपास लावुन, बॅगमधील सर्व वस्तूंसह सुमारे ६०,०००/- रु. (साठ हजार रुपये मात्र) किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल मूळ मालकाच्या म्हणजे आदिती विनोद आंब्रे यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आला.
खेड पोलीसांनी सतर्कतेमुळे 60,000/- रुचा मुद्देमाल असलेला असलेला लॅपटॉपची बॅग परत मिळवुन दिल्याबद्दल खेड पोलिसांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
