चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण येथे गणेशोत्सवात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण व चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण, श्री गणेश गौरव पुरस्कार व सन्मान सोहोळा २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम अन्वय वीरकर, दुसरा देवांश शिंदे, तिसरा इशीत संसारे, चौथा आयात तांबे, पाचवा द्वित पाटील, दुसऱ्या गटात प्रथम सार्थक आंब्रे, दुसरा विभागुन शर्विल हातणकर व शुभम कोठारकर, तिसरा शौर्य देवकर, चौथा मार्मिक मांडके, पाचवा निलेश भाटी, तिसऱ्या गटात प्रथम बिपीन सावंत, दुसरा रुद्र पुराणिक , तिसरा आदित्य कांबळी, चौथा विभागून रुद्र भोसले व साई जाधव, पाचवा विभागून रुद्र भुरे व मोक्षा बाफना, सुंदर हस्ताक्षर (मराठी) स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम आराध्य सुवारे, दुसरा वीरा गांधी, तिसरा अद्वैत रहाटे, चौथा आराध्या कदम, दुसऱ्या गटात प्रथम देवश्री माळी, दुसरा श्राव्या सुर्वे, तिसरा स्पृहा कलवारी, चौथा गाथा कदम, पाचवा आराध्या करंजकर, सुंदर हस्ताक्षर (इंग्रजी) स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम अभिराज गार्डी, दुसरा मयांक कुलकर्णी, तिसरा महिरा भालेकर, दुसऱ्या गटात प्रथम अवनी बुरटे, दुसरा मनवा सातारकर, तिसरा स्पर्श तांबट, उत्तेजनार्थ आरोही सावंत, रंगभरण स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम नायरा तडवी, दुसरा श्रीश यादव, तिसरा विरेन शिंदे, उत्तेजनार्थ रुची पांचाळ, दुसऱ्या गटात प्रथम शर्माली माने, दुसरा शौर्य कोळवणकर, तिसरा विघ्नेश वारंग, उत्तेजनार्थ शांभवी लघाटे व श्रीशा पांचाळ, तिसऱ्या गटात प्रथम श्लोक रोकडे, दुसरा रुद्र शिंदे, तिसरा मयांक कुलकर्णी, उत्तेजनार्थ रुणाद लाड व रेणू रहाटे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम हिमानिश ब्रह्मे, दुसरा स्पृहा कलवारी, तिसरा समृद्धी चव्हाण, उत्तेजनार्थ रेहांशी दांडेकर, दुसऱ्या गटात प्रथम चुलबुली शर्मा, दुसरा अर्णव कदम, तिसरा स्वरांजली बुरंबाडकर, प्रज्ञाशोध परीक्षेत पहिल्या (इयत्ता चौथी) गटात प्रथम शार्विल जाधव, दुसरा (विभागून) अन्विता पाटील, सौम्या आदवडे व श्लोक रोकडे, तिसरा मयांक कुलकर्णी, चौथा (विभागून) अंशिता मोरे, रिवांश वरुडे, श्रीशा खोत व अमन कांबळे, पाचवा (विभागून) रेहांश चाळके व अर्चित कापडी, दुसऱ्या (इयत्ता सातवी) गटात प्रथम स्वराज कदम, दुसरा दीपिका गावडे, तिसरा स्पृहा कलवारी, चौथा (विभागून) शुभ्रा सावंत व अन्वी दाभाडे, पाचवा (विभागून) ऋचा मेहेंदळे व विनोद राठोड अशी विविध स्पर्धांची पारितोषिके मिळविलेल्या विजेत्यांची नावे आहेत. सर्व विजेत्या स्पर्धकांनी २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव प्रभंजन पिंपुटकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर सावले यांनी केले आहे.