चिपळूण : येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. या निमित्ताने आमदार शेखरजी निकम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण व ‘श्री गणेश गौरव पुरस्कार’ तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार शेखरजी निकम यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धक व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मोहन मिरगळ, मिलिंद कापडी, वसंत उदेग, रमण डांगे, समीर जानवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
