खेड :- येथील पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या दहा दिवसाच्या श्री गणेशमुर्तीचे विसर्जन सोहोळा भक्तीमय, उत्साहपूर्ण वातावरणात जगबुडी नदीच्या पाण्याच्या विसर्जन सोहोळा पार पडला.
गणेशोत्सवाच्या कालावधीत संपुर्ण तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे काम पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, पोलीस काँस्टेबल, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई, होमगार्ड जवान दिवसरात्र करीत तालुक्यात कुठेही बाधा आणुन दिली नाही. ही कौतुकास्पद बाब असुन, गणेशोत्सवाच्या काळात उत्तमरीत्या चोख पोलीस बंदोबस्त ठेवुन, प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून, शांतता सुव्यवस्था सांभाळत, तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम उत्तमरीत्या करीत, श्री गणेश मुर्तींचा स्थापना सोहोळ्यापासुन ते गौरी-गणपती विसर्जन सोहोळा आणि आता अनंत चतुर्थीच्या विसर्जन सोहळ्यासह पोलीस सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री. गणेश मुर्तीचा विसर्जन सोहोळा आनंदात, उत्साहपूर्ण, भक्तिमय, वातावरणात पार पडला. या विसर्जन सोहळ्यात सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी, पोलीस महिला कर्मचारी, होमगार्ड जवान, महिलाही आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.