खेड :- तालुक्यातील बहिरवली फाटा येथील सुसेरी नंबर 1, बौद्ध वाडी येथील फिर्यादीत पती 22 वर्षीय साहील बाबुराव शिर्के यांचे राहत्या घरातून अज्ञात आरोपीने अपहरण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 324/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे अधिनियम कलम 140(अ) नुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याची फिर्यादीत पत्नि सौ. दिक्षा सिध्दार्थ जाधव वय 22, रा. शिर्शी ता खेड जि रत्नागिरीत यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली असून, हा गुन्हा बुधवार दि. 16 सष्टेबर 2026 रोजी मध्यरात्री 0.2.00 वाजताच्या सुमारास घडला असुन, या अपहरण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.