मुरुड जंजिरा (प्रतिनिधी ) : मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक काळात दिनाक 4 फेब्रुवारी रोजी मुरुड नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या दालनात बसून शासकीय पदाचा व कार्यालयाचा गैर वापर राजकीय प्रचार करीता करून निवडणूक आयोगाच्या निदर्शनाचे उल्लघन करून आचार संहितेचा भंग केला.
भारतीय न्याय संहिता कलम 174 ,223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 123 ( 7) प्रमाणे मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची फिर्याद मुरुड पंचायत समिती गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी दाखल केल्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर शिघ्रे ग्रामपंचायत माजी सरपंच संतोष पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी निवडणूक काळात वांदे शिघ्रे येथील मंदिरावर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे बॅनर लावला म्हणून निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन केले म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 174 223 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा तपास मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY