चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते विनायक राऊत हे सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी चिपळूण तालुक्यातील विविध मंदिरांना भेट देऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या देवी दर्शन दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ५ वाजता गावळकोट येथील करंजेश्वर मंदिरातील देवी दर्शनाने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता परशुराम धावजी मंदिर व शिवगर्जना सेवा मंडळ, ६ वाजता वालोपे येथील झोलाई मंदिर, तर ६.३० वाजता कुंभार्ली येथील महाकाली मंदिरात ते दर्शन घेणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता दादर येथील रामवरदायिनी मंदिर आणि ७.३० वाजता मोरवणे येथील सुकाई मंदिराला भेट देण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता दळवटणे येथील कान्होबा मंदिर, ९.१५ वाजता काविळतळी येथील ओंकार मित्र मंडळ, ९.३० वाजता मार्कंडी येथील भैरी भवानी मित्र मंडळ आणि ९.४५ वाजता चिपळूण येथील जुन्या कालभैरव मंदिरात दर्शनाचा कार्यक्रम आहे.
त्यानंतर रात्री १० वाजता वडनाका येथील एकवीरा मंदिर, १०.१५ वाजता बाजारपेठेतील देवीचे दर्शन आणि १०.३० वाजता पाग येथील सुकाई मंदिराला भेट देऊन या दौऱ्याची सांगता होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दौऱ्यात विनायक राऊत विविध देवी मंदिरांना भेट देणार असल्याने स्थानिक शिवसैनिक आणि भाविकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.
