चिपळूण : चिपळूणची सुकन्या डॉ. सायली अरुण भोजने यांनी दंतचिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे चिपळूणचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दंतचिकित्सा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले कार्य नवोदित डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत दंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी डॉ. सायली भोजने यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले, “डॉ. सायली भोजने यांची दंतचिकित्सा क्षेत्रातील कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे. चिपळूणच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”
या यशाबद्दल डॉ. सायली भोजने यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, अरुणशेठ भोजने, सौ. भोजने, पनवेलचे उपायुक्त वैभव विधाते, सौ. विधाते, चिपळूण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपमुख्याधिकारी अनंत मोरे, अर्बन बँकेचे संचालक समीर जानवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी, रत्नागिरी जिल्हा सोशल मीडियाचे सचिन साडविलकर, विजय भुवड, वरुण (दादू) गुडेकर, विश्वनाथ कांबळे, राजा कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीदेखील शुभेच्छा दिल्या.
