मंडणगड – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व जपण्यासाठी राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्यावतीने “गड किल्ले मोहीम गडकिल्ले बांधणी आणि गडकिल्ले माहिती स्पर्धा 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिवाळी विशेष म्हणून घेण्यात येत असून, यामध्ये स्पर्धकांना स्वतः किल्ल्याची प्रतिकृती बनवून त्याबद्दलची माहिती सादर करायची आहे. स्पर्धा खुल्या गटात होणार आहे. स्पर्धा मंडणगड शहर आणि भिंगळोली या दोन पुरती मर्यादित आहे. तसेच स्पर्धकाने बनवलेल्या किल्ल्याबद्दल अथवा कोणत्याही किल्ल्याची माहिती परीक्षकांसमोर सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी पहिले 50 प्रवेशच स्वीकारले जातील. विजेत्यांना योग्य बक्षिसाने गौरविण्यात येईल.

परीक्षण करणारी टीम आपल्या पत्त्यावर भेट देणार असल्याने नाव नोंदणी करताना आपला योग्य पत्ता द्यावा. या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये आणि युवकांमध्ये गड-किल्ल्यांबद्दल अभिमान आणि इतिहासाची जाणीव निर्माण होणार आहे. स्पर्धेचा कार्यक्रम नियम याबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क सतीश बेर्डे, नवज्योत सिंग गौड, समीर कदम, आनंद नारकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.