चिपळूण : नगरपालिकेने यापूर्वी तीनदा बाजारपेठेत जागेवर जाऊन बेशिस्त व्यापारी, हातगाडीवाले यांना फक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. या तीनही वेळी स्थानिक व्यापारी वर्गाकडून कारवाईची मागणी होऊनही नप कडून कोणाचाही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नव्हता. परंतु वारंवार सूचना देऊ नये ठराविक जणांनी आपला व्यवसाय गटारीवर व गटारीच्या पुढे रस्त्यावरती आणल्यामुळे नाईलाजाने नगरपालिकेला जप्तीची कार्यवाही करावी लागली यामध्ये कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही शिवाय पुढे आलेले फक्त स्टॅन्ड- छत्री- पत्रे इत्यादी जप्त करण्यात आलेले आहे.
यात ६ हातगाडी व ३ ट्रॉली साहित्य याचा समावेश आहे याबाबत ग्राहक व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेशिस्त व्यापाऱ्यांनी व्यवसाय रस्त्यावरती व्यवसाय आणल्याने बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा निर्माण होतो यामुळे मूळ ग्राहक बाजारपेठेत यायला नाकारतो व इतरत्र खरेदीचा पर्याय निवडतो यामुळेच बाजारपेठ वरती बहादूर शेख कडे वाढत चालली आहे ही खंत मूळ व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली. परंतु सध्या लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढल्याने चुकीच्या बेशिस्त गोष्टींना पाठबळ मिळेल याबाबत व्यापारी वर्गातून शंका व्यक्त होत आहे.
