मुंबई : “आजचे बोलघेवडे पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकरांना मीठाप्रमाणे वापरतात. स्वादानुसार त्यांचा उपयोग करतात. संघ हा उपेक्षितांसाठी काम करतो म्हणून आज जर शाहू, फुले, आंबेडकर असते तर त्यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थनच केले असते” असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काढले.

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश प्रवक्ते व सिद्धहस्त अवधूत वाघ यांनी लिहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या जयोस्तुते या बहुप्रतिक्षित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

या प्रसंगी बोलताना लेखक अवधूत वाघ यांनी समरसतेवर जोर दिला. “दोन वस्तू असमान असू शकतात पण त्यात उच्च-नीच असा भेद नसावा. तसाच माणसा-माणसात उच्च-नीच हा भाव नसावा” असे विचार त्यांनी मांडले.

आपल्या आक्रमक भाषणात आमदार संजय उपाध्याय यांनी “आजचा हिंदू एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करणारा नाही तर जो मारेल त्याचे हातपाय तोडणारा आहे” हे निक्षून सांगितले.

मुंबई येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य व दिमाखदार कार्यक्रमात जयोस्तुते या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुनील कर्वे, मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके, लोकसत्ताचे संदीप आचार्य, पुढारीच्या मृणालिनी नानिवडेकर, तरुण भारतचे किरण शेलार, मॅक्स महाराष्ट्रचे रवींद्र आंबेकर, जय महाराष्ट्रचे प्रसाद काथे , ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत जतिन देसाई यांनीही आपले विचार मांडले.

या समारंभात अवधूत वाघ यांनी वनवासी कल्याण आश्रमाला ९ लाख ५० हजार रुपये तर नेत्रदीप प्रतिष्ठान या दृष्टिहीन बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला तिनं लाख ६५ हजार रुपयांची देणगी देऊन समाजाप्रती असलेली आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

अतिशय दिमाखदार स्वरूपात पार पडलेल्या या समारंभास महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मंत्री भाई गिरकर, माजी आमदार अतुल शहा, नगरसेवक नवनाथ बन, प्रकाश गंगाधरे, मंगेश पवार, श्वेता परुळेकर, किशोर मोघे , गणेश हाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH