सुधागड (धम्मशील सावंत) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ९ मार्च वा वर्धापनदिन आणि १९ मार्चला होणारा मनसेचा गुढी पाडवा मेळावा याचे नियोजन करण्यासाठी आज सुधागड पाली येथील वीरेश्वर मंगल कार्यालय, धोंडीवली, पेडली आसरा रोड येथे रायगड मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .
मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यंदाचा वर्धापन दिन स्वराज्याच्या राजधानी रायगडच्या पायथ्याशी घेण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे समजते, मनसेचे वरिष्ठ नेत्यांनी किल्ले रायगड व परिसराची नुकतीच पाहणी देखील केली आहे. वर्धापन दिनाचे यजमानपद रायगडला मिळाल्यास खूप भाग्याची ,स्फूर्ती व ऊर्जा देणारी बाब असेल असे मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी वर्धापन दिन झाल्यास तो ऐतिहासिक व भव्य स्वरूपाचा असेल असा विश्वास देखील मनसे सैनिकांनी व्यक्त केलाय. वर्धापन दिन स्थळ व वेळ याविषयी मनसेचे वरिष्ठ नेते अधिकृत घोषणा करतील असे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, अमोल पेणकर, दिलीप सांगळे, दीपक कांबळी, छाया शिंदे आदी जिल्हा पदाधिकारी व सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल साठे व इतर तालुकाध्यक्ष उपस्थित होते. या जिल्हा बैठकीचे यशस्वी व नीटनिटके नियोजन सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल साठे व पदाधिकारी मनसैनिकांनी केले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻