खेड : कोकणातील शिमगोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. कोकण रेल्वेसह एस. टी. बस फुल झाली आहे. रेल्वेत पाय सुद्धा टाकायला जागा न मिळाल्याने चाकरमानी हताश झाले आहेत.
गावच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर ठाणे, मुंबई, बोरिवली कडील चाकरमानी यांनी परतीसाठी रेल्वेस्टेशन गाठले. खेड स्टेशनवर येणारी एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस आधीच तळकोकणातून खचाखच भरून आली होती. खेड रेल्वेस्टेशनवर प्रवाशांची प्रचंड झालेल्या गर्दीमुळे अनेकांना या ट्रेनमध्ये चढायला जागा मिळाली नाही. तर काहीजण गर्दीत जागा करत गाडीत शिरले. दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्यासाठी खेड हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे.
खेड स्टेशनवर मंगला एक्स्प्रेस पकडण्यासाठी झालेली गर्दी पाहून स्टेशन मास्टर यांनी तिकिटे आपापल्या जबाबदारीवर काढण्याची घोषणा केली, फलाटावर लागताच गाडीच्या दरवाजापर्यंत प्रचंड गर्दी झाली होती. अशातच लहान बाळांसह मुंबई गाठण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडली. अनेकांना गाडीत शिरता न आल्याने त्यांनी पुन्हा खेड बसस्थानक गाठले खेड बसस्थानकावर मिळेल त्या गाडीत उभ्याने प्रवास करत मुंबई गाठली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH