मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करण्यात आली असून, त्याजागी आता दादर-गोरखपूर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई-कोंकणवासियांच्या मनात तीव्र संतापाची लाट पसरली असून, याविरोधात आज दि. २४/०३/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे उपाध्यक्ष योगेश सांवत यांच्या शिष्टमंडळाने घेतली.

जर येत्या काही दिवसांत रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन लवकरात लवकर सुरू झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा यावेळी मनसेच्या नेत्यांनी रेल्वे प्रशासनास दिला. मनसेने दिलेल्या निवेदनाची प्रत सोबत जोडत आहे.