​चिपळूण : तालुक्यातील आकले कांगणेवाडी (पुनर्वसन) येथील श्रीराम मंडळ ट्रस्ट तर्फे चैत्र शुद्ध नवमी, गुरुवार दि. २६ मार्च रोजी श्री राम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
​गावातील श्री राम मंदिरात सकाळी ८ मूर्तीवर अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर सकाळी १० ते दु. १२.३० पर्यंत श्रीराम जन्मकाळ कीर्तन होईल. ह.भ.प. श्री ओंकार महाराज कदम हे कीर्तनकार असून ह.भ.प. विश्वनाथ महाराज सुतार व ह.भ.प. दिव्येश महाराज सुतार हे गायनाचार्य आहेत. तर मृदंगमणी ह.भ.प. गणेश महाराज पांचाळ साथ देणार आहेत.
​दुपारी १२.४४ वाजता: प्रभू श्रीराम जन्मकाळ , दुपारी १ वाजता: आरती व तीर्थप्रसाद , दुपारी १.३० वाजता: महाप्रसाद , २.३० वाजता: रामरक्षा पठण व श्रीराम जप , सायंकाळी ४ वाजता: सत्यनारायण महापूजा , ​सायंकाळी ६ वाजता: आकले चोरगेवाडी येथील महा मंडळाचा हरिपाठ , रात्री ८ वाजता: महाप्रसाद ,
​रात्री ८.३० वाजता आकले कांगणेवाडी संगीत भजन होणार असून त्यामध्ये गायनाचार्य म्हणून प्रभाकर वारोसे व लक्ष्मण वारोसे हे योगदान देणार आहेत.
​रात्री ९:३० वाजता: स्वागत व देणगीदारांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर ​रात्री १०:०० वाजता: नवविकास नमन मंडळ अबिटगाव दत्तवाडी यांचा ‘बहुरंगी नमन’ हा कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी पहाटे ४ वाजता छबीना होणार आहे.