लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी या मतदारसंघात प्रवेश करण्यापूर्वीच विकासकामे योग्य प्रकारे करून जनतेला आपलेसे केले. आता या मतदारसंघात दुसरा कोणताही उमेदवार त्यांच्या विरोधात राहिला तरी तो निवडून येणे शक्य नाही. किरण सामंत हे आश्वासन देऊन काम करून दाखवणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत.

ते प्रत्येक महिन्याला आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ते अगदी नगरपंचायत, वाडी-वस्तीवर जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतात. तेही प्रत्येक महिन्याला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात असतात. असा अनुभव यापूर्वीच्या खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आपल्या विभागात कधी दिला नाही. मात्र, किरण सामंत हे विकासकामांचा सातत्याने आढावा घेत असतात.

जर एखाद्या अधिकारी किंवा ठेकेदाराकडून कामाची दिरंगाई झाली आणि ती सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली, तर ते तात्काळ फोन करून कामाला विलंब का झाला, असे विचारतात आणि ते काम कधीपासून सुरू करणार, असे ठणकावून विचारतात. त्यामुळे किरण सामंत हे महाराष्ट्रातील २८८ आमदारांपैकी एकमेव प्रभावी आमदार ठरतात.