चिपळूण : गॅस सिलेंडरची टंचाई भासत असल्यामुळे शासनामार्फत धान्य दुकानावर रॉकेल देण्यात येणार आहे असे शासनाने जाहीर केले होते, ते अद्याप देण्यात येत नसल्यामुळे लोकांची फार मोठी गैरसोय झाली आहे.
तरी ताबडतोब धान्य दुकानावर रॉकेल पुरवठा सुरू करावा अशी मागणी चिपळूण पंचायत समिती माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
व ते पुढे म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागामध्ये लाकडावर चूल पेटवणे फार अवघड झाले आहे. शहरा मधले लोक अपार्टमेंट मध्ये राहत असल्यामुळे ते लाकडी चूल पेटवू शकत नाहीत,त्यांना स्टो पेटवण्यासाठी रॉकेल ची फार आवश्यकता आहे.
तरी रॉकेल पुरवठा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सुरू करावे अशीही मागणी श्री मुकादम यांनी केली आहे.
रेशन दुकानावर रॉकेल वाटप करणार होते ते गेले कुठे..? -शौकत मुकादम
