मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केल्याने या स्मारकाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प ठेवल्यानेच स्मारकाच्या कामाला उशीर होत आहे.

मुंबईतली खेळाची मैदाने ही विद्यार्थी, खेळाडूंसाठीच असतील, हेच या सरकारचे धोरण आहे. तिथे कुठल्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. आणि बिल्डरांच्या गप्पा तुम्ही मारताय? कोविडकाळात कशा पद्धतीने बिल्डरांवर उधळपट्टी करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे.महाविकास आघाडी सरकार असताना बिल्डरांना रेड कार्पेट टाकायचे आणि बिल्डरांना मोठेमोठे मोक्याचे भूखंड देण्याचे काम तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने केले होते. संजय राऊत, तुमची किती बिल्डरांसोबत भागीदारी आहे हे महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असेही श्री. बन यांनी सुनावले.

एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडे असल्याचे भान ठेवा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली आणि डिसेंबर 2026 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा भाजपा – महायुती सरकारचा मानस असल्याचेही श्री. बन यांनी स्पष्ट केले.