खेड : – संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड या कंपनीविरोधात स्थानिक स्तरावर आंदोलन तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत ११ ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन सादर केले आहे. याशिवाय आणखी २६ ग्रामपंचायतींकडूनही ठराव तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर कंपनीकडून गावोगावी जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला जात आहे. काही ग्रामपंचायतींच्या नावाने चुकीची माहिती पसरवून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.