लांजा (गोविंद चव्हाण) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही२२ व्या वर्धापन दिनानिमित्त पाच दिवसांचा हरीनाम सोहळा दि.२६ ते३०एप्रिल पर्यंत चालणार आहे.
दि.२६ते२९एप्रील गुरुवर्य ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्तन होणार व ३० रोजी विदर्भ येथील गुरुवर्य ह.भ.प.अशोकानंद कव्हर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.दररोज पहाटे काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा भजन, माऊली हरीपाठ लांजा तालुका वारकरी मंडळी यांचा, या नंतर कीर्तन,व त्या नंतर महाप्रसाद हरीजागर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख ह.भ.प.सुभास राणे पवार वाडी सेवा मंडळ व रूक्मिणी माता महीला मंडळ वेरवली लांजा.