मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या अंमलबजावणीमध्ये विरोधकांकडून टाकल्या जाणाऱ्या अडथळ्यांच्या आणि क्षुद्र राजकारणाच्या निषेधार्थ आज मुंबईतील रस्त्यांवर युवतींनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन केले.

भाजप मुंबई अध्यक्ष आमदार श्री. अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री. दिपक सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात मुंबईतील सहा जिल्ह्यांतील प्रमुख महाविद्यालयांबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व युवती सहभागी झाल्या.