लांजा (गोविंद चव्हाण) : अखिल भारतीय हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते विलासराव खानविलकर यांचा तृतीय स्मृतिदिन रत्नागिरी येथील गुरूकृपा मंगल कार्यालयात भव्यदिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नऊ जिल्ह्यांतील हिंदू महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात हिंदू महासभा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. तसेच सर्व मान्यवरांची भाषणे झाली.

या कार्यक्रमात अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्ता सणस, प्रमुख कार्यवाह तथा कोषाध्यक्ष महेश सावंत, कोषाध्यक्ष हरिश शेलार, उपाध्यक्ष गोविंद तिवारी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, प्रवक्ते आनंद कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कोल्हापूर महिला अध्यक्षा शिला माने, राजापूरचे ज्येष्ठ नेते रमेश विचारे, सुनील माने, गायत्री परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, महादेव पवार, प्रवीण बाबर, राजेंद्र शिरसागर, सुशील रमेश, दत्ता राणे, रमेश गांधी, अरुण माली, प्रताप खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख तिलोत्तमा खानविलकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विलासराव खानविलकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रस्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.