रोहा ( अल्ताफ चोरडेकर) रोहा मुस्लिम समाजातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रोहा एज्यूकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशन या शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकित अंजुमन हायस्कूलचे चेअरमन अब्दुल कादिर रोगे ग्रुपने पुन्हा एकदा आपला करिष्मा सिद्ध केला आहे.
एक महिन्यापूर्वी झालेल्या समाजाच्या निवडणुकीत अ.कादिर रोगे यांच्या ग्रुपचा दारुण पराभव झाला होता.मात्र रेवा शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत या पराभवाचा उठ्ठा काढत प्रतिस्पर्धी उमेदवारांना दणका दिला आहे.तर दुसरीकडे जेष्ठ संस्थापक सदस्य भाई उस्मान रोहेकर यांनी संस्थेच्या स्थापने पासून अद्याप सातत्याने निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.या निवडणुकीत विरोधी बाक देखील मजबुत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीत संस्थेवर काम करणाऱ्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला
