मुंबई : भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्विट करून काय म्हटलंय पाहुयात जनाब संजय राऊत, माणसं सांभाळायला पैसे लागत नाही तर प्रेम लागतं.

पण राऊत आणि त्यांच्या पक्षाला ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना नेते टिकवता आले. कार्यकर्त्यांनी साथ सोडली, नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.

विधान परिषद निवडणुकीत १५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खोटा आरोप केला आहे. पण नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून उबाठा गटाला साधा उमेदवारही देता आला नाही. त्यामुळे इतरांवर खोटे आरोप करण्यापूर्वी नाशिकमध्ये नेमके काय व्यवहार झाले?नाशिकच्या दौऱ्यांमध्ये राऊतांनी किती बॅगा भरून घरी आणल्या? उमेदवार का दिला नाही?याचं उत्तर राऊतांनी पत्रकार परिषदेत द्यावं

ज्यांच्या स्वतःच्या पक्षात उमेदवार उभा करण्याची ताकद नाही, त्यांनी लोकशाहीच्या नावाने आरोपांची खोटी आतषबाजी करू नये.