पोफळी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५/०६/२०२६ रोजी महाजनको वसाहतीमध्ये वसाहतीतील सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच स्थापत्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
तसेच दिनांक ०६/०६/२०२६ रोजी माजी मुख्य अभियंता मा. चोपडे साहेब, अधीक्षक अभियंता (प्रशासन) संतोषजी चव्हाण, अधीक्षक अभियंता आव्हाड साहेब तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने विद्युत प्रकल्प टप्पा १ व २, टप्पा ३, टप्पा ४ तसेच वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
“झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देत वाढते प्रदूषण, हवामानातील धोके आणि पर्यावरणातील बदल लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कंपनीच्या वतीने जवळपास २०० झाडे लावण्यात आली.
