मुंबई : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून सुरू आहे या आंदोलन करणाऱ्या महिलांच्या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट दिली. तसेच महिलांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचण्याचा विश्वास आंदोलन करता महिलांना दिला. यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांना फोन लावून महिलांच्या आंदोलनाविषयी माहिती दिली त्यानंतर आरोग्य मंत्री यांनी तात्काळ आंदोलक महिलांसोबत बुधवारी बैठक लावून चर्चा करणार असल्याचं सांगितलं. याबद्दल मी आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांचं आभार मानते असे सुप्रियाताई सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा शासकीय सेवेत अंतर्भाव करणे आणि ज्यांना दहा वर्षे झाली नाहीत त्यांना स्थायित्व देण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. सरकारकडून याबाबत सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण महिलांच्या हक्कासाठी नेहमी कार्यरत राहू असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये पराकोटीचे मतभेद असू शकतात पण टोकाचे पाऊल उचलून हल्ला करणे किंवा शाई फेकणे हे लोकशाहीसाठी हानिकारक असून, आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दृष्टीने अयोग्य वाटते. असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,भेसळ जर कोणी करत असेल, तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग ती कारवाई कोणत्याही जिल्ह्यात असो किंवा ती कितीही मोठ्या व्यक्तीवर असो. भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई होत असेल, तर त्याचे मनापासून स्वागतच आहे.असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.