जालना : जिल्ह्यातील गोळेगाव येथे सुमारे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

गोळेगाव येथून पुरुषोत्तमपुरीकडे जात असताना ही घटना घडली. वाळू उपसा करणाऱ्या बोटीचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करण्यात येत होता. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाली.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून अनेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. प्रशासन, पोलीस आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले.

मात्र, पाण्यात बुडाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.