लांजा : तालुक्यातील हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जावडे अर्थात हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथे नवागत विद्यार्थी स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
इ.१ ली, ५ वी व ८ वी मध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी यांची ढोल व ताशे यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्यांचे ओवाळणी करून व फुल देऊन स्वागत करण्यात आले तसेच या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यानंतर शासनाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, संस्थेचे विश्वस्त आर्यवर्धन कांबळे जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होत.