लांजा (गोविंद चव्हाण) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुलाखाली साटवली रोड ते कुणबी पतसंस्था या दरम्यान पदचारी, कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अंडरपास उभारण्याच्या मागणीसाठी लांजा तालुका संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर १३ जून २०२६ रोजी आमदार किरण सामंत यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून १९ जून २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जनतेची बैठक आयोजित केली होती.
बैठकीला न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेट्ये, महमद रखांगी, प्रदीपकुमार बेंडखळे, प्रकाश लांजेकर, संपदा वाघदरे, अल्लाउद्दीन नेवरेकर, बबन मयेकर, चंद्रकांत परवडी, नाना मानकर, दिलीप चौगुले, सूर्यकांत लांजेकर, काका शिंदे, शिवाजी कोत्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
