चिपळूण : समाजाप्रती असलेली जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले निःस्वार्थ कार्य याची दखल घेत लायन्स क्लब चिपळूण यांच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञ सौ. श्रुतीका कोटकुंडे मॅडम यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
मॅडम स्वतःचा मौल्यवान वेळ आणि वैयक्तिक खर्चाची पर्वा न करता पूर्ण प्राथमिक शाळा, रावतळे येथे नियमितपणे येऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि नैतिक जडणघडणीसाठी मनापासून कार्य करत आहेत. मुलांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार रुजविण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या समाजहिताच्या निःस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा म्हणून लायन्स क्लब चिपळूण यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कार्याला मनःपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
