लोणावळा : कर्जत रेल्वेमार्गावरील मंकी हिल परिसराच्या पुढे, किलोमीटर 119 जवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकजवळ पुरुष जातीचा मृतदेह आढळल्यानंतर संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली. त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, हा अपघात आहे की अन्य काही कारण, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रेल्वे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
