खोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर सध्या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने नटले आहे. सभोवताली पसरलेल्या डोंगरांच्या उंच रांगा, त्यावर दाटलेली धुक्याची पांढरी चादर आणि आल्हाददायक पावसाळी वातावरणामुळे शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.संपूर्ण आठवडा मुंबईच्या गजबजाटात आणि गर्दीत जगणारे मुंबईकर वीकेंडला मनाला शांतता मिळवण्यासाठी या परिसराला पसंती देत आहेत. खोपोलीमध्ये पर्यटनासोबतच धार्मिक स्थळांचाही उत्तम संगम आहे. येथे प्रसिद्ध गगनगिरी आश्रम, टाकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अष्टविनायकांपैकी एक असलेले महडचे वरदविनायक देवस्थान यांसारखी पवित्र ठिकाणे आहेत. तसेच निसर्गाचा थरार अनुभवण्यासाठी ‘जेनिथ’ आणि ‘आडोशी’ हे विहंगम धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खोपोलीला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. विशेष म्हणजे या सर्व पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी स्थानिक पातळीवर रिक्षा आणि खाजगी गाड्यांची उत्तम सोय उपलब्ध आहे. त्यामुळे या पावसाळ्यात खोपोलीची सफर नक्कीच एक सुवर्णसंधी ठरेल!
About The Author
Related Posts
Recent Posts
- राहुल गांधींना घाबरून भाजपकडून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : अतुल लोंढे…
- उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार चिपळूण शहर महिला आघाडीतर्फे रक्षाबंधनानिमित्त कामथे येथील डॉक्टरांना राखी..
- नाशिकमध्ये आजपासून ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन..
- चिपळूणमध्ये रस्त्यावर गाय व्यायली.. नगरपालिकेकडून सुटका; पावणे दोन तास चालली मोहीम…