चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) ते पाग पॉवर हाऊस सागर प्रेस या दैनिक सागरचे संस्थापक संपादक नानासाहेब जोशी मार्गाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आज शनिवार दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
चिपळूण पोलीस स्टेशनसमोर नानासाहेब जोशी नामफलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, पालिकेच्या सर्व समितींचे सभापती व त्यांचे नगरसेवक, मुख्याधिकारी श्री जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
