चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त आमदार शेखर निकम हे सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी चिपळूण शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. या गणेशोत्सव दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या दौऱ्यात आमदार शेखर निकम शहरातील विविध शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच गणेशोत्सव मंडळांना भेटी देणार आहेत. त्यानुसार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक
सायंकाळी ६.०० ते ६.१५ – एम.एस.ई.बी.
६.१५ ते ६.३० – पोलीस स्टेशन
६.३० ते ६.४५ – भाजी मंडई – गांगण शेठ
६.४५ ते ७.०० – ताजा बाजार – शिंदे
७.०० ते ७.१५ – चिपळूण नगरपालिका
७.१५ ते ७.३० – सार्वजनिक गणेशोत्सव
७.३० ते ७.४५ – चिपळूणचा महाराजा
७.४५ ते ८.०० – नवसाचा राजा
८.०० ते ८.१५ – बहादुरशेख नाका
८.१५ ते ८.३० – राहुल गार्डन – मिलिंद शेठ
८.३० ते ८.४५ – सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण
दरम्यान, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या नियोजित ठिकाणी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
