चिपळूण : शहरातील खेंड येथील राधाताई लाड वैश्य भवन सभागृहात १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला आणि परंपरेचा सुरेख संगम साधत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनादरम्यान स्त्री सौंदर्याचे रूप खुलवणाऱ्या विशेष स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असून १८ वर्षांवरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांची संख्या ५० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. स्पर्धांमध्ये तीन मुख्य बक्षिसे आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दीपसाज अलंकार स्पर्धा

१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ‘दीपसाज अलंकार स्पर्धा’ होणार आहे. या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण दुपारी १२.३० वाजता करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत मोठी समई किंवा किमान एक फूट उंचीच्या समई अथवा दिव्याची आकर्षक सजावट करायची आहे. सजावटीतून प्रतीकात्मक संदेश देणे अपेक्षित असून पर्यावरणपूरकता, कल्पकता आणि सृजनशीलता या बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.

सजावटीसाठी पान-फुले, मुखवटे, कट-आउट, दागिने, साडी, कापड आदी साहित्याचा वापर करता येणार आहे. मात्र, सजवलेला दिवा किंवा समई प्रज्वलित करायची नाही. ही स्पर्धा केवळ सजावटीची असून पूजेसाठी नाही.

सजावटीचे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे आवश्यक आहे. स्पर्धकांना घरातून सजावट करून समई आणता येईल किंवा सभागृहात येऊन सजावट पूर्ण करता येईल. स्पर्धेचा अंतिम निर्णय परीक्षक व आयोजकांचा राहणार आहे.

पिठापासूनच्या अलंकारांची स्पर्धा

१७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ‘पिठापासूनच्या अलंकारांची स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत दागिने केवळ पिठापासून तयार केलेले असणे आवश्यक आहे. कच्च्या पिठापासून तयार केलेले दागिने स्पर्धकांनी घरातूनच बनवून आणायचे आहेत. तळलेले दागिने स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

दागिन्यांची मांडणी सुबक, कलात्मक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आवश्यक असून मांडणी केवळ केळीच्या पानावरच करणे बंधनकारक आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन होणे आवश्यक आहे.
👉 https://chat.whatsapp.com/DN7hGDRuWAuC78OV73OZSc

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ७७२०८७८८४४, ९८२२०७४२७४, ८३८००८९२०४ आणि ८८८८०७०९७४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

चिपळूण परिसरातील महिला आणि कलाप्रेमींनी या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.