रत्नागिरी : जातीय जनगणना करत असताना ओबीसींसाठी रकाना नाही , हा ओबीसींवर मोठा अन्याय आहे, ओबीसी संघर्ष समिती चिपळुण याबाबत आज निवेदनाव्दारे शासनाकडे दाद मागत आहे.
जनगणनेत ओबीसींवर होत असलेला अन्याय ही सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या गांभिर्याने घेण्यासारखा विषय आहे, कारण बहुजन समाज पार्टी चे संस्थापक मान्यवर कांशिरामसाहेबांनी “ओबीसींसाठी मंडल आयोग लागू करो.” चा नारा देउन ओबीसींसाठी मोठे आंदोलन देशभरात उभे केले होते आज बहुजन समाज पार्टी सुध्दा देशभरात ओबीसींसाठी वैचारिक आंदोलन उभे करुन लढा उभारत आहे म्हणुन जातीय जनगणना होत असताना ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाबाबत बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांच्या खाद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईलच पण त्याचबरोबर बसपाचे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम साहेब सुध्दा ओबीसी जनगणेत होणारा अन्यायाबाबत, जातीयवादी सरकारचा बुरखा फाडुन ओबीसींचा चा मुद्दा राज्यसभेत मांडून देशपातळीवर आवाज उठवतील आणि बसपा चे प्रदेशाध्यक्ष सुनिल डोंगरे साहेब सुध्दा राज्यभरात ओबीसी बांधवांसाठी आवाज बुलंद करतील ,बहुजन समाज पार्टी ओबीसी वर्गाला न्याय देण्यासाठी सदैव पाठीशी आहे,असे बहुजन समाज पार्टी रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे, जिल्हाप्रभारी सचिन मोहीते, अनिकेत पवार, जिल्हामहासचिव आनंदा कांबळे यांनी सांगितले.