पनवेल : गेली अनेक वर्षे जगभरातील देश भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 12 वर्षात विश्वास, विकास, आणि जनकल्याणाची जी काम केली त्यातून आपल्या देशाकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपल्या देशाने जगाला दाखवून दिले आम्ही केवळ बाजारपेठ नाही आम्ही एक महासत्ता आहोत,असे प्रतिपादन मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती पर्वानिमित्ताने आज पनवेल येथे रायगडचे संपर्क मंत्री आणि राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी कालखंडातील केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. अर्थात हे आमचे सेलिब्रेशन नसून ज्या जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या जनतेल्या केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जातो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ही बारा वर्ष विश्वासाची विकासाची आणि जनकल्याणाची आहेत. या देशाचे प्रधान सेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काम केले, सेवा दिली, कर्तव्य केले, असा जनाधिकार, असा लोकांचा, मतदारांचा आशिर्वाद यापुढे कुणाला मिळेल की माहिती नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 22 राज्यांमध्ये आम्ही जनतेची सेवा करीत आहोत. ही भारतीय राजकारणातली दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये तर आणि त्यातही विशेषत: एशियन देशामध्ये असलेली अस्थिरता पाहिली तर अशा प्रकारे एक नेतृत्व, एक पक्ष, एक सरकार, आणि त्याची वाढती लोकप्रियता याचे उदाहरण अन्य कुठेही सापडणार नाही, असेही ते म्हणाले.
जगाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला – मंत्री ॲड.आशिष शेलार
