लांजा: तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथे गव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. मागील आठ दिवसांपासून गव्यांच्या कळपाने परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा गव्यांचा कळप देवधे मणचेकरवाडी येथे सतत शेतांमध्ये फिरताना दिसतो. या गव्यांनी आंबा आणि काजूच्या झाडांची नासधूस केल्याने शेतकरी त्रस्त झाले असून ऐन हंगामातच हे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.