लोटे : – खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मध्ये एका कामगारांचा कर्तव्य बजावत असताना आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक १५ च्या रात्री उशिरा घडली. लोटे मधील एका रासायनिक कारखान्यामध्ये रविवार दिनांक १५ रोजी रात्री उशिरा एका कामगाराचा अकस्मिक मृत्यू झाल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झाली नसली तरी ठेकेदारीतील एका वर्मा नामक कंत्राटी कामगाराचा रविवार दिनांक १५ रोजी रात्री उशिरा आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत परिसरातून अशा चर्चा आहेत की, त्या कामगाराच्या पोटात रसायन गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा.
मात्र कारखान्याच्या अधिकृत सूत्रांकडून आणि रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या कामगाराला कर्तव्यावर असतानाच अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कामगाराला कारखान्यातच अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला याची कल्पना दिली. यानंतर कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ त्या कामगाराला चिपळूण येथील एस एम एस रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र उपचारादरम्यान या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून याबाबत सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही.