लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील जाऊ येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांचे आणि शेतीचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या अडचणी आणि झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून थेट माहिती जाणून घेतली. पाहणीदरम्यान त्यांनी नुकसानग्रस्त भागाची स्थिती समजून घेतली.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.